Sunday, January 16, 2011

हिमालयात फिरताना ...

सह्याद्रीच्या कुशीत खुप खेळलो होतो असे नाही पण सुरुवातच म्हणा ना... अगदीच नवशिके... कर्नाला, महाबलेश्वर, आम्बोली घाट अशी काही मोजकी ठिकाणे सोडली तर सह्याद्री अजुन तरी पालथा घालायचा होता की तोपर्यंत हिमालयाने साद घातली ... जायचे की नाही हा प्रश्न नव्हता कारण पुढील शिक्षणाकरता संधी मिळाली होती ती वाया घालवने योग्य नव्हते. मग काय.. फेब्रुवारी २००८ मध्ये देहरादून येथे भारतीय वन्यजीव संस्थान ह्या भारत सरकारच्या वन अणि पर्यावरण खात्याच्या स्वायत्त संस्थेत शोधार्थी म्हणून रुजू झालो आणि माझ्या हिमालयातील भटकंतीला सुरुवात झाली.
  गढ़वाल हिमालायत सापडणारया औषधी वनस्पति प्रजातिन्वर संशोधन करायचे होते.. भटकंतीची आणि शोधकार्याची आवड असल्याने बऱ्याचशा विषम गोष्टींवर मात करून पुढचा प्रवास करता आला. अनेक जणांच्या मार्गदर्शनाशिवाय  हा प्रवास शक्यच नव्हता.
ह्या ब्लॉग च्या निमित्ताने हाच प्रवास आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न ...